पारनेर / भगवान गायकवाड, 
सूपा (जांभूळवाडी) जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी मुखध्यापिका कांता बनकर, शिक्षकवृंद सुवर्णा पवार, मीना चाकणे, मनिषा ताजवे,ईश्वरीय परिवारातील देवराम ढोले, सुमन ढोले, रामदास गाढवे, पार्वती गाढवे, व प्रतिमा माता तसेच जिल्हा परिषद स्कूल शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राच्या ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी उपस्थित शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी यांना सुमधुर वाणीने प्रवचन दिले त्या म्हणाल्या की, दरवर्षी प्रमाणे आपण रक्षाबंधन हा सण बहीण भावाचे पवित्र व प्रेमळ नाते, या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षाबंधन म्हणजे दोन शब्द यात आहेत. रक्षा व बंधन भाऊ आपल्या बहिणीला रक्षा करण्याचे वचन देतो. बंधन आहे ते प्रेमाचे, विश्वासाचे आपुलकीचे पावित्र्याचे असे हे आगळे वेगळे सर्वांना हवे हवेसे वाटणारे रक्षाबंधन! स्नेहबंधन! पण हे सर्व करण्या मागचे आध्यात्मिक महत्व काय आहे, म्हणतात की एकदा देवांचे असुरांसोबत युद्ध होते. तर इंद्र देवाची पत्नी इंद्रायणीने रक्षणासाठी ओवाळताना मस्तकावर विजयाचे प्रतीक तिलक लावला. तेव्हा पासून रक्षा बंधनाला सुरवात झाली. या आधी पुरोहित घरी येऊन लाल धागा बांधत होते. परंतु कालांतराने हा अधिकार कुमारीना दिला गेला. कारण कन्या हि पवित्र आहे. म्हणून बहिण भावाचे हे नाते मनाला अलौकिक सुख देऊन जाते. म्हणजेच तिलक हि आत्मस्मृतीची निशाणी आहे. तांदूळ हे अखंडत्वाचे प्रमाण देते की या शरीराला चालवणारी शक्ती हि अजर अमर व चैतन्य आहे. जिचा विनाश होत नाही.
 दिवा हे आत्मा अमरत्व सांगते. तर मिठाई हे आत्म्यातील सात गुण सुख, शांती, प्रेम आनंद, द्यान, पवित्रता व शक्ती दर्शवण्यासाठी खाऊ घालतात खऱ्या रूपात स्वतः गुणवान बनून दुसऱ्यांना पण गुणवान बनविणे होय. व राखी की ज्या मध्ये रक्षा करणे परंतु खरी रक्षा तर ईश्वरच करू शकतो आपण जेव्हा पण मनापासून आठवण करतो, तेव्हा तो आपल्याला मदत करण्यासाठी बांधलेला आहे. कारण ईश्वराने वचन दिले आहे की मला बोलविले तर मी पण मदत देण्यास तयार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पवार यांनी केले तर आभार मीना चाकणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version