पारनेर / प्रतिनिधी,
आयुष्यात निरोगी व सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम व योगा केला पाहिजे. आणि म्हणूनच जगाला योगाचा फायदा व्हावा म्हणून मागील ११ वर्षांपासून जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. आज पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेत सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडुळे व शिक्षक राजाराम वाघ यांच्या मार्गदर्शनात शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला.
सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात शाळेच्या मैदानात लहान लहान विद्यार्थ्यांनी उत्साह पुर्ण वातावरणात विविध आसणे, योगासने व प्राणायाम केले. विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही यात आनंदाने सहभाग घेतला. यावेळी आयुष्यात निरोगी व सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम व योगा केला पाहिजे. आणि म्हणूनच जगाला योगाचा फायदा व्हावा म्हणून मागील ११ वर्षांपासून जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. आज पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेत सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडुळे व शिक्षक राजाराम वाघ यांच्या मार्गदर्शनात शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला.
याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक संदीप महांडुळे म्हणाले की, योगा ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. योगा व प्राणायामामुळे मनुष्य निरोगी व सुदृढ जीवन जगतो. सकाळी व्यायाम व योगासने केल्याने मनुष्य दिवसभर उत्साही राहतो. आश्रमशाळेतील शिक्षक राजाराम वाघ, लतिफ राजे, समाधान भुसारे, वसंत काळे, संतोष पट्टेकर, सुरेंद्र पाटील, प्रशांत पादीर आदींनी परिश्रम करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
