पुणेवाडी येथे बांधकाम कामगारांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

पारनेर/प्रतिनिधी : 
बांधकाम कामगार हा आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आपले गाव, शहर आणि देश विकसित होत आहे. मात्र, त्यांच्या कल्याणाकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यांच्या कामाच्या सुरक्षिततेसाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी अशा साहित्य वाटपासारख्या उपक्रमांची गरज आहे. महाराष्ट्र शासन आणि कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही कामगारांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पुणेवाडी येथे बांधकाम कामगारांसाठी उपयुक्त साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.जयश्री शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मा. काशिनाथ दाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाद्वारे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.कार्यक्रमास भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बांधकाम कामगारांना त्यांच्या कामात उपयुक्त ठरणारे साहित्य वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या कामाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. बांधकाम कामगारांनीही या साहित्य वाटपामुळे आपल्या कामात सुविधा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम स्थानिक नागरिक आणि कामगारांसाठी प्रेरणादायी ठरला असून, समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version