तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर

पारनेर – नगर जिल्ह्यातील विविध वर्तमानपत्रांसाठी १९९२ पासून काम करणारे व १९९७ पासून ” दैनिक पारनेर समर्थ ” या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून संपादकांच्या भुमिकेते तून पत्रकारितेची लेखनी चालविणारे शिवश्री सुरेश काशिनाथ खोसे पाटील यांना मराठा सेवा संघ प्रणित बीड जिल्ह्यातील आष्टी येथील तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचा पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ” जिजाऊ माँ साहेब आदर्श संपादक पुरस्कार २०२६ ” जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवश्री ज्येष्ठ पत्रकार अॅड सिताराम पोकळे यांनी दिली आहे.
      पत्रकार व संपादक सुरेश खोसे पाटील यांनी १९९२ पासून आपल्या पत्रकारितेच्या लेखनीतून समाजातील अन्याय, अत्याचार यावर प्रकाश टाकत न्याय मिळवून देण्याचे काम केले, समाजातील कृषी, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक, सहकार, आर्थिक, राजकीय, या व इतर क्षेत्रांवर सातत्याने लेखन केल्याने याचे वास्तव समाजाला समजले, यातून खरे, खोटे लक्षात आणून देण्याचे काम ही त्यांनी केले.

      सुरेश खोसे पाटील हे संपादक असलेले ” दैनिक पारनेर समर्थ ” हे दैनिक फक्त पारनेर तालुक्या पुरते मर्यादित न राहता अहिल्यानगर जिल्हा व राज्यात ही नावलौकिकास पात्र ठरले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पत्रकारांसाठी कार्य करत असलेला देशातील सर्वांत मोठ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांना प्रथम पारनेर तालुका उपाध्यक्ष, नंतर अहिल्यानगर जिल्हा सचिव पदावर काम करण्याचा करण्याची संधी देत, आता राज्य कार्यकारिणी वर सदस्य पदावर काम करण्याचा बहुमान दिला. त्यांच्या पत्रकारितेच्या लेखनीची दखल घेत त्यांना राज्यातील विविध संस्थांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले आहे.

    सुरेश खोसे पाटील यांच्या या बहुमानाबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे , पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ . निलेश लंके, माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी ताई विखे पाटील, आ. काशिनाथ दाते, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंदराव वाकडे, प्रदेश सचिव डॉ. विश्वासराव आरोटे व इतरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version