पारनेर / भगवान गायकवाड,
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी पारनेर नगरपंचायत कडून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पारनेर नगरपंचायत नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युनिटी ऑफ मूलनिवासी समाज ,राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश रोकडे,नगरसेविका हिमानी नगरे, पाणी पुरवठा सभापती योगेश मते, नगरसेवक भूषण शेलार, नगरसेवक युवराज पठारे, डॉ.सादिक राजे,ज्येष्ठ नेते बन्सी भाऊ घंगाळे,ज्येष्ठ नेते बाळासाहेब नगरे, संपत नगरे,खा. निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर शहराध्यक्ष अमित जाधव, बाळासाहेब शेटे, भगवान नगरे,आर पी आय ( आंबेडकर गट) तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, राष्ट्रवादी ( शरद पवार गट) शहराध्यक्ष वैभव गायकवाड, ॲड. मोनिका सोनवणे, आर पी आय ( आठवले गट) शहराध्यक्ष प्रदीप नगरे, सुनील चौधरी, बाळासाहेब कांबळे, सलीम शेख, राजूभाई शेख ,डी बी साळवे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष संपत पवार, रेवण साळवे, जयवंत साळवे, मधुकर साळवी, रामेश्वर पवार,ॲड मयुरी जाधव, नितीन साळवे, छगन औटी,सुदाम भोसले, घोडके मॅडम, अरुणा सोनवणे, दत्तात्रय श्रीमंदिलकर, चंद्रकांत गायकवाड आदी सह उपासक उपासिका उपस्थित होते.
