पारनेर / भगवान गायकवाड,
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एका शिक्षण संस्थे तर्फे संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी तेथे इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळे फासले होते व त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ कायद्यासंदर्भात निवेदन पारनेर तालुका पुरोगामी चळवळीच्या वतीने तहसीलदार गायत्री सौंदणे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत पुरोगामी चळवळीतील समस्त बहुजनांचे नेते लेखक, प्रभावी वक्ता ,प्रवीण गायकवाड यांच्यावर १३ जुलै २५ रोजी अक्कलकोट येथे पूर्वनियोजित भ्याड व जीवघेणा हल्ला करून त्यांच्या हत्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रवीण गायकवाड गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्रात व संपूर्ण देशात बुद्ध, कबीर, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेच्या प्रसार प्रसाराचे काम करत आहेत.भाजपा आणि आरएसएस चा पदाधिकारी कुख्यात गुंड दीपक सिताराम काटे आणि त्यांच्या साथीदारांनी प्रवीण गायकवाड पूर्व नियोजित हल्ला केला आहे. आम्ही पुरोगामी चळवळीतील सर्व संघटना या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहे.
या निवेदनावर युनिट ऑफ मूलनिवासी राजेंद्र करंदीकर, छत्रपती क्रांती सेना अविनाश देशमुख, युनिट ऑफ मूलनिवासी बाळासाहेब पातारे ,संभाजी ब्रिगेडचे सचिन काकडे, भूमिपुत्र शेतकरी संघटना संतोष वाबळे ,संभाजी ब्रिगेड सुदाम कोरडे, संभाजी ॲड.सविता नगरे ,सामाजिक कार्यकर्ता हिरामण सोनवणे, संभाजी ब्रिगेड एड.सोमनाथ गोपाळे, सामाजिक कार्यकर्ते ॲड .बाळासाहेब सोनवणे ,आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रदीप नगरे ,सामाजिक कार्यकर्ते अमित जाधव, युनिट ऑफ मूलनिवासी आयुब भाई शेख, युनिटी ऑफ मूलनिवासी रफिक राजे ,संभाजी ब्रिगेड रामकृष्ण पवार, संभाजी ब्रिगेडचे जय गायकवाड, मराठा सेवा संघाचे बबनराव वाबळे ,विनायक सोनवणे समशेर खान ,दादाभाऊ पटेकर ,सिताराम लवांडे , संतोष अडसूळ, प्रदीप कसबे, संदेश बर्वे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
