पारनेर / भगवान गायकवाड, 
  संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एका शिक्षण संस्थे तर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी इंदापूरच्या शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळे फासले होते व त्यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याचा राज्यभरातून पुरोगामी चळवळीतील संघटनानी निषेध व्यक्त केला होता. 
    पारनेर तालुका पुरोगामी संघटनेच्या वतीने सावित्री फातिमा सद्भावना मंचचे समन्वयक डॉ. आर जी सय्यद, युनिटी ऑफ मूलनिवासी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर,राहुलनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, जमात ए इस्लामचे पठाण (सर), महमंद पटेल, आयाजभाई शेख, चांदभाई शिरूरुकर आदी पदाधिकारी यांनी प्रवीण गायकवाड यांची पुणे येथे जाऊन भेट घेतली आणि पारनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. पारनेर तालुक्यात लवकरच प्रवीण गायकवाड यांची उपस्थितीत पुरोगामी चळवळी मधील सर्व संघटनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीनं पारनेर तालुक्यात नियोजन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version