पारनेर / भगवान गायकवाड, 

      दलित पॅंथर चळवळीचा अग्रणी आवाज आणि विद्रोही साहित्याने सामाजिक व्यवस्थेच्या गाभ्याला हादरा देणारे महान कवी नामदेव ढसाळ यांची चळवळ आजही प्रेरणादायी ठरते आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडून विशेषता डॉ. स्वप्नील ढसाळ यांच्याकडून आंबेडकरी विचारांची जोपासना सुरू असून या परंपरेत आणखी एक उज्वल पाऊल टाकण्यात आलं. भीमशाहीर गायिका सीमा प्रधान यांचा गौरव. 

   डॉ. स्वप्निल ढसाळ यांनी आपल्या नवी मुंबईतील कार्यालयात गायिका सीमा प्रधान यांचा औपचारिक सत्कार केला. आपल्या आंबेडकरी गाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाचा झंजावात उभा करणाऱ्या प्रधान यांच्या योगदानाची ही समाजाने घेतलेली प्रगल्भ दखल होती. सीमा प्रधान यांची भूमिका केवळ गाण्यापूर्ती मर्यादित नसून त्यांनी गाण्याच्या माध्यमातून गावागावात, चौका चौकात, लोकांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवले त्यांचा आवाज ही चळवळीची ताकद बनली आहे .या कार्याचा गौरव खुद्द नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांनी केला.सीमा प्रधान व त्यांचे पती नंदकुमार प्रधान या दोघा दांपत्याचा सत्कार केल्यामुळे या सन्मानाला अधिक गहिरे पण प्राप्त झाले आहे. गायिका सीमा प्रधान म्हणाल्या पॅंथर कवी नामदेव ढसाळ यांच्या घरातून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी एक प्रेरणा आहे .हा केवळ सन्मान नाही तर माझ्या कार्याला नवी संजीवनी देणारा शक्तीपुरवठा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version