पारनेर / भगवान गायकवाड, 

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राजयोगिनी मंजू दिदी यांनी मनातील विचारांच्या गतीवर भाष्य करताना सांगितले की, मनात व्यर्थ आणि नकारात्मक विचारांची गती जंगलासारखी झपाट्याने वाढते, तर सकारात्मक विचार बागेतील रोपट्यासारखे हळूहळू विकसित करावे लागतात. विचारांचा चेहरा आणि कपाळावर परिणाम होतो, ज्यामुळे चिंता दिसून येते. ज्याप्रमाणे शरीराचे आजार नाडीच्या गतीने समजतात, त्याचप्रमाणे मनाचे आजार विचारांच्या गतीने कळतात. सत्संग, चांगले विचार आणि सतत मनन-चिंतनाने मनाचे आजार कमी होतात, असे त्या म्हणाल्या.


यावेळी मंजू दिदी यांनी ईश्वराची आठवण तीन प्रकारे होते असे सांगितले: दुःखात, कुणाच्या सांगण्यावरून आणि विचारांनी सतावणारी आठवण. जर मनात राग-द्वेष असेल, तर ईश्वराची आठवणही येत नाही आणि मन स्वच्छ राहत नाही. अशुभ भाव ठेवल्यास सूक्ष्म पापकर्माचे भागीदार बनतो, असे त्यांनी नमूद केले.

रक्षाबंधनाच्या संदेशात राजयोगिनी राजेश्वरी दिदी यांनी सांगितले की, मानवाची दृष्टी, वृत्ती आणि कृती शुद्ध व श्रेष्ठ असेल, तरच खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरे होईल. कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजयोगिनी राजेश्वरी दिदी, प्रभा दिदी, ज्ञानेश्वरी दिदी, पारनेर केंद्राच्या ब्रह्माकुमारी साधना दिदी, लताबाई खोडदे, देवराम ढोले, ॲड. शिवाजी जाधव, जबाजी खोडदे, हिराबाई मगर, देवराम खोडदे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी केले, तर ईश्वरीय परिवाराने सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version