पारनेर / भगवान गायकवाड,
ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE) प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता पुणे, मुंबई किंवा कोटा यांसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही. टाकळी ढोकेश्वर आणि पारनेर येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी दर्जेदार अकॅडमी सुरू झाली असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता आपल्या घराच्या जवळच राष्ट्रीय स्तराचे शिक्षण मिळणार आहे.या अकॅडमीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे शिकवणारे शिक्षकवृंद. कोटा, नारायणा आणि एलेन यांसारख्या देशातील नामांकित संस्थांमध्ये ८ ते १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांची येथे नेमणूक करण्यात आली आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि गणित या विषयांचे सखोल मार्गदर्शन येथे केले जाते. विशेषतः कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने समजण्यासाठी ‘डिजिटल क्लासेस’चा प्रभावी वापर केला जातो, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे.अकॅडमीने अल्पावधीतच आपले यश सिद्ध केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांनी ‘JEE मेन’ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये अनुजा वाफारे (कर्जुले हरेश्वर), सोहम झरेकर (कान्हूर पठार, आयुष गायखे (वासुंदे).
या विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात अकॅडमीच्या शैक्षणिक दर्जाची चर्चा होत आहे.केवळ ११ वी, १२ वीच नव्हे, तर ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीही येथे फाउंडेशन कोर्स उपलब्ध आहेत. यात स्कॉलरशिप, NTSE, NMMS आणि नवोदय यांसारख्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करून घेतली जाते.इयत्ता १० वीतून ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १३ एप्रिलपासून ‘मोफत फाउंडेशन कोर्स’ म्हणजेच फ्री डेमो क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला ‘विकली टेस्ट’ घेतली जाते आणि त्याचा निकाल थेट पालकांना पाठवला जातो.
प्रवेशासाठी पत्ता व संपर्क:
टाकळी ढोकेश्वर: स्वर्ग सिटी पॉइंट.
पारनेर: बस स्टँडसमोर, HDFC बँकेच्या वर, पहिला मजला.
संपर्क ८३७८९९९८९७ / ८८३०७४७३०७
या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधावा, असे आवाहन अकॅडमी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
