उबाठा शिवसेना महिला तालुकाप्रमुख प्रियांकाताई खिलारी यांचा शिवसेना(शिंदे गट)मध्ये प्रवेश, तात्काळ त्यांची महिला उपजिल्हाप्रमुख पदी निवड, शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या हस्ते केला प्रवेश, सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वात केला प्रवेश…
शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या उद्याच्या पारनेरमधील बैठकी आधीच महिलातालुकाप्रमुख पक्ष सोडून गेल्याने शिवसेना उबाठाला शोधावा लागणार नवीन महिला तालुकाप्रमुख…
अळकुटीच्या सरपंच व विद्यमान शिवसेना(शिंदे गट) तालुकाप्रमुख कोमलताई भंडारी यांच्यानंतर प्रियांकाताई खिलारी यांच्या प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाला महिलांचे संघटन वाढविण्यासाठी मिळणार आणखी एक महिला नेतृत्व…
पारनेर नगरपंचायत मधील विद्यमान काही नगरसेवक तसेच पारनेर तालुक्यातील आणखीन उबाठा शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते करणार भविष्यात पक्षप्रवेश तसेच इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही पक्षप्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सुतोवाच केले आहे.
