पारनेर | ता. प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड नुकतीच घडली. समाजाभिमुख भूमिका, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उद्योजक सोमनाथ वरखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार दाते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस हा सामान्य जनतेच्या विश्वासाचा, विकासाचा आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा पक्ष आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला समान संधी आणि सन्मान देत समाजहिताच्या कामांना प्राधान्य दिले जाते. निघोज परिसरासह संपूर्ण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले तर विकासाची गती आणखी वाढेल. नव्याने पक्षात सहभागी झालेल्या प्रत्येक सहकाऱ्याच्या विश्वासाला न्याय देणे हीच आमची जबाबदारी आहे.”
उद्योजक सोमनाथ वरखडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत आमदार काशिनाथ दाते यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर आणि सर्वसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यावर विश्वास व्यक्त केला. समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक राजकारणाची गरज असून त्या विचारातूनच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषद माजी सदस्य वसंतराव चेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. कापसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीपशेठ रोहोकले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, बाळासाहेब लामखडे, विठ्ठल कवाद, आनंदराव वराळ, व्हा. चेअरमन हिरामण सोनवणे, रोहीदास लामखडे, महादू लामखडे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️ “आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विकासाभिमुख, सर्वसमावेशक आणि जनतेशी कायम जोडलेल्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. मतदारसंघातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची त्यांची कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांसाठी सातत्याने केलेला संघर्ष यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) परिवारात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात आ. दाते सरांच्या नेतृत्वाखाली निघोज गटासह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.”
– उद्योजक सोमनाथ वरखडे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️ “आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या कार्यपद्धतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार दिवसेंदिवस अधिक भक्कम होत आहे. उद्योजक सोमनाथ वरखडे यांचा पक्षप्रवेश हा दाते सरांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा आणि पक्षाच्या वाढत्या ताकदीचा पुरावा आहे. निघोज गटात संघटन अधिक सक्षम करून प्रत्येक गावात विकासाची गती वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने कार्यरत राहू. आगामी काळात दाते सरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जोमाने जनतेची सेवा करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
– सौ. सुधामती कवाद (जिल्हा कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस)
