अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 

“सामाजिक जाणिवेतून बदलाच्या कृतीकडे, युवा जागृतीतून राष्ट्र निर्माणाकडे” या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन, वंचित घटकांसाठी गेल्या ३७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘स्नेहालय’ संस्थेचे ३५ वे राज्यस्तरीय ‘युवानिर्माण शिबीर’ येत्या २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. स्नेहालय पुनर्वसन संकुलात होणाऱ्या या तीन दिवसीय निवासी शिबिरात युवकांना सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत बनवण्याचा मानस आहे.

समाजात वाढता व्यक्तिवाद, बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि डिजिटल माध्यमांचा अतिरेक यांसारखी आव्हाने असताना, युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, मानवी मूल्ये व लोकशाही विचार रुजवण्यासाठी हे शिबीर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २० ते ३० वयोगटातील निवडक १५० युवक-युवतींना यात प्रवेश दिला जाणार असून, महाविद्यालयांतील एनएसएस (NSS) व एनसीसी (NCC) चे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील.
शिबिरामध्ये तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन, सामूहिक श्रमदान, करिअर मार्गदर्शन, गटचर्चा, योगवर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेरणागीते यांसारखे विविध रचनात्मक उपक्रम राबवले जाणार आहेत. युवकांमध्ये चारित्र्यनिर्माण करणे, त्यांना विधायक कार्याची प्रेरणा देणे आणि सामाजिक समस्यांवर कृतीशील नेतृत्व विकसित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.


महत्त्वाची माहिती:
नावनोंदणी https://www.snehalaya.org/volunteer-youth-camp या लिंकद्वारे १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.प्रवेश शुल्क: ३०० रुपये (https://snehalayacrm.org/donateonce द्वारे भरणा आवश्यक). निवास व भोजनाची मोफत सोय असेल. आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्र, पॅन कार्ड, फोटो व कॉलेज लेटर.संपर्क: अधिक माहितीसाठी ९०११०२६४७२, ९८५०००८३९६ किंवा ८२७५८९९९५९ वर संपर्क साधावा.स्वतःसाठी जगताना समाजासाठीही काहीतरी देण्याची भावना युवकांमध्ये निर्माण करून, त्यांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात जोडणारे हे एक प्रभावी सामाजिक शिक्षण अभियान ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version