पारनेर / भगवान गायकवाड, 
 
         अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष मा. उपमुख्यमंत्री ना. छगनराव भुजबळ व समता परिषद कार्याध्यक्ष मा. खासदार समीरभाऊ भुजबळ यांनी अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सुभाष लोंढे यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन मेहेत्रे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ढवळे, महानगराध्यक्ष ब्रिजेश ताठे, कार्याध्यक्ष अभिषेक चिपाडे, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, कार्याध्यक्ष अंकुश ताजणे यांची नियुक्ती केली आहे.
        सुभाष लोंढे यांनी सांगितले की, जिल्हा अध्यक्षपदी फेर नियुक्ती करून मा. छगन भुजबळ साहेब व मा. समीरभाऊ भुजबळ यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला तो मी सार्थ ठरवील. सर्व ओबीसी बांधवांना बरोबर घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात महात्मा फुले समता परिषदचे काम करणार आहे. सर्व तालुक्यात शाखा उघडण्यात येतील. लवकरच जिल्हा कार्यकारणी करावयाची आहे. तरी कार्यकारणी मध्ये काम करण्याची आवड असणाऱ्या ओबीसी घटकातील बांधवांनी संपर्क करावा.
         या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे व इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ओबीसी महामंडळाचे मा. अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष मा. आ. पांडुरंग अभंग, प्रदेश संघटक रविभाऊ सोनवणे, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, प्रदेश प्रवक्ते डॉ. नागेश गवळी, प्रदेश प्रचारक प्रा. संतोष विरकर, जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, पद्मकांत कुदळे, प्रदेश चिटणीस अनिल निकम, प्रदेश प्रवक्ते मुकुंद सोनटक्के, भगवानराव फुलसौंदर, अभय आगरकर, शरदभाऊ झोडगे प्रा. माणिकराव विधाते, किशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे, संजय गारूडकर, रमेश गोरे, किसनराव रासकर, राजु शिंदे, सुवर्णा धाडगे या मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version