भोयरे पठार- खुर्दमध्ये ७० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
पारनेर / ता. प्रतिनिधी
सोमवार दि. १६ जानेवारी २०२६ पारनेर तालुक्यातील भोयरे पठार व भोयरे खुर्द येथे सुमारे ७० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार काशिनाथ दाते सरांचे चिरंजीव उद्योजक दिलीप दाते यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना उद्योजक दिलीप दाते यांनी सांगितले की, पारनेर-नगर मतदारसंघात सर्वदूर विकासकामे सुरू असून विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकास हा तळागाळापर्यंत पोहोचायला हवा त्या जाणिवेतून सातत्याने नवीन निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.
समारंभासाठी अकोळनेर गावचे सरपंच प्रतीक शेळके, छबू कांडेकर, राजेश बोरकर, अरुण पंडित, राजेश बोरकर, डॉ. अमोल टकले, आप्पा मुठे, सागर कदम, संजय मुठे, कृष्णकांत टकले, अशोक टकले, अशोक उरमुडे आप्पा मुठे, योगेश गाडे, राहुल आंबेकर यांसह भोयरे पठार गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भोयरे खुर्द येथील सभामंडप, भोयरे पठार येथील सभामंडप, भोयरे खुर्द ग्रामपंचायत कार्यालय, भोयरे पठार येथील ४५० मीटर डांबरीकरण रस्ता तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील रस्ता काँक्रिटीकरण या कामांचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ७० लाख रुपयांच्या या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
🔶🔶🔶🔶🔶
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या माध्यमातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सर्व कामे मंजूर होऊन पूर्णत्वास आले आहे. आ. दाते यांच्या नेतृत्वाखाली विकासाची ही गती भविष्यातही कायम राहील, असा विश्वास ग्रामस्थांसह जनतेच्या मनात राहील असं काम आम्ही करणार.
– दिलीप दाते, उद्योजक पारनेर
