पारनेर / प्रतिनिधि, 
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरचे पत्रकार विनोद किसन गायकवाड यांची निवड करण्यात आली. सांगली येथील डिजिटल मिडियाच्या राज्याच्या पहिल्या अधिवेशनामधे निवड झाल्यानंतर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील,आमदार गोपीचंद पडळकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे,जर्नालिस्ट असो.चे अखिल भारतीय अध्यक्ष अशोक वानखेडे,प्रदेश सचिव डाॅ.विश्वासराव आरोटे,डिजिटल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ भोकरे, राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख महेश शिंगोटे आदींसह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पत्रकार बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार विनोद गायकवाड यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस मा. डॉ. विश्वासराव आरोटे व पत्रकार बांधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version