‘श्री. विश्वनाथ दादा कोरडे युवा मंच’ आणि ‘महायुती पारनेर’ यांच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व शैक्षणिक मदतीतून समाजसेवेचा संदेश

पारनेर I प्रतिनिधी, 
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यात विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ‘श्री. विश्वनाथ दादा कोरडे युवा मंच’ आणि ‘महायुती पारनेर’ यांच्या वतीने आयोजित या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमांना भाजपचे अहिल्यानगर जिल्हा समन्वयक विनायकराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.


▪️विरोली येथे वृक्षारोपण…..
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विरोली येथील पिंपळेश्वर देवस्थान परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. विखे पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन हा हरित उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

▪️कान्हूर पठार येथे शिक्षणाला बळ….
कान्हूर पठार येथे आयोजित कार्यक्रमात एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक अभ्यासिकेला सुमारे ५० हजार रुपयांच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या लोकसहभागातून सुरू असलेल्या बांधकामासाठी ५१ हजार रुपयांचा मदतनिधी सुपूर्द करण्यात आला.

या मदतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक साधने उपलब्ध होणार असून शाळेच्या विकासालाही चालना मिळणार आहे.

▪️रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…..
कान्हूर पठार येथील मुख्य चौकात, मारुती मंदिरासमोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शेकडो युवक व नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. संकलित रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
यावेळी भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे म्हणाले, “पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस केवळ औपचारिकतेपुरता न साजरा करता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचावा, या उद्देशाने वृक्षारोपण, शैक्षणिक मदत आणि रक्तदान यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे उपक्रम यशस्वी ठरले.”

या प्रसंगी विलास महाराज लोंढे, मुख्याध्यापक नवले सर, हरी व्यवहारे (मेजर), काकडे गुरुजी, नामदेव ठुबे, सुभाष ठुबे (मेजर), सीताराम नरवडे, काशिनाथ नवले, प्रवीण व्यवहारे, सागर व्यवहारे, श्रीकांत ठुबे, अतुलराव माने, संग्राम पावडे, किशोर ठुबे, अर्जुन नवले, सुशांत ठुबे, मंगेश खोसे, भरत ठुबे, तुषार ठुबे, रमेश गाडगे, गोकुळ ठुबे, कानिफनाथ ठुबे, भाऊसाहेब गाडगे, अंकुश बुचुडे, दादाभाऊ नरवडे, प्रकाश ठाणगे, बबन घुमटकर, संदीप ठुबे, सरपंच शोभा गाडगे, विजय गाडगे, वसंत शिंदे यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण तालुक्यात या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक होत असून वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version