पारनेर / भगवान गायकवाड, 

      सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सरपंच जान्हवी दुधाचे यांनी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन लोणी हवेली गावचा कायापालट केला असल्याचे गौरवोद्गार खासदार निलेश लंके यांनी काढले.
       शनिवारी दि.२६ जुलै रोजी लोणी हवेलीच्या नवीन ग्रामसंसद भवनाचा लोकार्पण सोहळा खासदार निलेश लंके यांच्या हस्ते रिबीन कापून संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजी रोहकले, वाळवणे माजी सरपंच सचिन पठारे आदी उपस्थित होते.
       खासदार लंके पुढे बोलताना म्हणाले की, लोणी हवेली गावाने मला भरभरुन प्रेम दिले, त्याबदल्यात मी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे आणि यापुढेही निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन यावेळी खा.लंके यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
      यावेळी सरपंच सौ. जान्हवी बाजीराव दुधाडे म्हणाल्या की, गेली साडेचार वर्षात खा. निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हंगा ते लोणी हवेली रस्ता डांबरीकरण, जामगाव घाट ते लोणी हवेली रस्ता डांबरीकरण, लोणी हवेली ते कोल्हे मळा रस्ता डांबरीकरण, आखारवाडी ते सजगणी रस्ता काँक्रीटीकरण करणे, वाडावस्ती ते पाझर तलाव रस्ता काँक्रीटीकरण करणे, लोणी हवेली ते करंडगाव रस्ता डांबरीकरण करणे, स्मशानभूमी सुशोभिकरण तसेच दशक्रिया विधी परीसर सुशोभिकरण करणे, बचतगट भवन इमारत, जामगाव शिव रस्ता, पारनेर ते लोणी हवेली रस्ता डांबरीकरण व काँक्रीटीकरण, कोल्हे मळा अंगणवाडी, खडकवाडी इमारत, कोल्हे मळा इमारत, गावठाण प्राथमिक शाळा इमारत, अभुतपुर्व अशी वृक्ष लागवड, कोल्हे वस्ती प्राथमिक शाळा, खडकवाडी प्राथमिक शाळा, गावठाण प्राथमिक शाळा या शाळांमध्ये अभूतपूर्व बदल, तसेच जलजीवन योजनेच्या दोन कोटीच्या कामातून प्रत्येक घराला दिले नळ कनेक्शन, तसेच साडेचार वर्षाच्या काळामध्ये १५० घरकुले ही मंजुर केले.
        या सर्व विकासकामांसाठी ग्रामपंचायत उपसरपंच अमोल दुधाडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी थोरे, अशोक कोल्हे, सीमा कोल्हे, सुशमा दुधाडे, कोमल सोंडकर, शत्रुघन दुधाडे, रोजगार सेवक तालुकाध्यक्ष बाजीराव दुधाडे, ग्रामविकास अधिकारी श्रीमंती शिल्पा लवांडे, ग्रामविकास अधिकारी सुनील दुधाडे, प्राध्यापक संजय कोल्हे, माजी सरपंच लहू अण्णा कोल्हे, चेअरमन कृष्णाजी बाबूजी कोल्हे, जयसिंग कोल्हे पाटील, बबन ढाकणे, बाळासाहेब जाधव, संभाजी थोरे, मच्छिंद्र कोल्हे गुरुजी, किसन दुधाडे गुरुजी, परशुराम कोल्हे गुरुजी, अँड.अशोक कोल्हे, हरिभाऊ कोल्हे गुरुजी, निलेश वाखारे, बबलू कोल्हे, किसन नाना दुधाडे, युवराज कोल्हे, देवराम दुधाडे, जिजाबापू दुधाडे, अनिल दुधाडे, दिलीप बाबूजी, बंडू कोल्हे, अंकुश दुधाडे, बंटी दाते, यारकर दुधाडे, लिंबराज दाते (तंटामुक्ती अध्यक्ष), चेअरमन दत्तात्रय दुधाडे, सत्यवान सोंडकर, यशवंत सोंडकर या सर्वांचे सरपंच सौ जान्हवी बाजीराव दुधाडे यांना लोणी हवेली विकास कामात फार मोलाचे योगदान सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 लोणी हवेली ग्रामस्थांनी मला सरपंच पदासाठी संधी दिली या संधीचे सोने करण्यात तसेच खासदार निलेश लंके साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन व सहकार्य या सर्व गोष्टीमुळे मला लोणी हवेली गावाचा चेहरा मोहरा बदलण्यात यश आले त्यांबद्दल मी स्वतः ला भाग्यवान समजते.
        – सौ जान्हवी बाजीराव दुधाडे, सरपंच लोणी हवेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version