पारनेर / भगवान गायकवाड, 
  मौजे सुपा ता. पारनेर येथील गट नंबर ४०६ मध्ये महाराष्ट्र शासना मार्फत कचरा डेपो प्रकल्पासाठी जागा मिळालेली आहे. त्या कचरा डेपो मध्ये कचरा विलीनीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभा करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी निवेदन दिले आहे.
    दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे सुपा ता. पारनेर हे गाव पारनेर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. मागील चार ते पाच वर्षापासून सुपा गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सुपा परिसरात मोठी एम आय डी सी असल्याने सुपा गावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुपा गावची लोकसंख्या ३०, ०००ते ३५००० च्या आसपास झाली असून त्या मुळे सुपा गावचा कचरा प्रश्न वाढत आहे. त्या मुळे सुपा गावचा दैंनदिन गोळा होणारा कचरा हा मोठ्या प्रमाणात साचत आहे.
   मागील वर्षी ग्रामपंचायत सुपा ता. पारनेर येथील गट नंबर ४०६ मध्ये महाराष्ट्र शासना मार्फत दोन एकर जागा मिळालेली आहे. परंतु त्या जागेत कचरा विलीनीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभा करणे जरुरीचे आहे. त्या प्रकल्पासाठी निधी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, युवा नेते योगेश रोकडे,सुप्याचे सरपंच मनिषा रोकडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version