आवक घटली परंतु कांद्याला भाव स्थिर; दुबईच्या निर्यातदारांकडुंन ६ कंटेनर रवाना

पारनेर / भगवान गायकवाड, 
   महाराष्ट्रात कांदा खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा दर्जेदार कांद्याला दुबई व श्रीलंकेतील (कोलंबोतुंन )मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.त्यामुळे दोन दिवसापूर्वी पारनेर बाजार समितीच्या आवारातील कांदा दुबईच्या परदेशवारी निघाला असून पाशा ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीचे निर्यातदार अब्दुल कादर पाशा यांनी ६ कंटेनरमध्ये १८० टन कांद्याची खरेदी केली आहे.त्यामुळे पारनेर सह श्रीगोंदा जुन्नर नगर तालुक्यात पिकणारा कांद्याला आखाती देशांमध्ये मागणी वाढली आहे.तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला पारनेर बाजार समितीतील कांदा परदेश वारीसाठी निघाला आहे.

     पारनेर बाजार समितीतील साईबाबा ट्रेडिंगचे प्रकाश भंडारी यांच्या माध्यमातून दुबई येथील पाशा ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीने ही कांदा खरेदी केली असून या बाजार समिती मध्ये विकणारा कांदा हा दर्जेदार व निर्यातक्षम असल्यामुळे परदेशात याला मागणी असल्याचे सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव सह संचालक मंडळाने सांगितले आहे.तर भविष्यात याठिकाणी गोडावुनची उभारणी करुन कांदा खरेदी करण्याचा मानस
 पाशा ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक अब्दुल कादर पाशा यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे भविष्यात पारनेर बाजार समितीच्या माध्यमातून परदेशात कांदा निर्यात केला जाणार आहे.

    दुबईच्या कांदा कंटेनर रवाना प्रसंगी बाजार समितीचे संचालक माजी सभापती गंगाराम बेलकर व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती रेपाळे,सचिव सुरेश आढाव, संचालक चंदन भळगट, व्यापारी किसन गंधाडे,एकनाथ पडवळ,चेतन भळगट, राहुल सातपुते, नितीन तामखडे, स्वप्निल भंडारी, रावसाहेब झंजाड, माणिक खोडदे, महादू तोडकर,राजु बेलोटे, अक्षय बेलोटे, यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
 गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर बाजार समितीमध्ये कांदा व्यापार करणाऱा ५ ते ७ व्यापारांनी परदेशात दर्जेदार व निर्यातक्षम कांदा पाठविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.तर या व्यापाऱ्यांवर संचालक मंडळ व प्रशासनाचा अंकुश असल्यामुळे बाजार समिती येणारा कांदा हा जाहीर लिलाव पद्धतीने व पारदर्शक पद्धतीने विक्री केली जात आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत आहे.एकीकडे पारदर्शक कारभारामुळे व भाव चांगला मिळत असल्याने विक्रमी आवक बरोबर परदेशवारी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
पुणे व नगर जिल्ह्यातून कांदा आवक…..
पारनेर तालुक्यासह संगमनेर श्रीगोंदा नगर शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादकांची पसंती या बाजार समितीला असून श्रीलंका कोलंबो, बांग्लादेश सह दुबई व आखाती देशांमध्ये या दर्जेदार व निर्यातक्षम कांद्याला मागणी आहे.त्यामुळे या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून गेल्या डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याच्या काळात विक्रमी आवक झाली आहे.तर परदेशात या कांद्याला मागणी असल्याने आनंदाची व कौतुकास्पद बाब आहे.
सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव 

🔶🔶🔶🔶🔶
कांदा आवक घडली मात्र भाव स्थिर…
पारनेर बाजार समितीच्या आवारात बुधवारी झालेल्या कांदा लिलावात ७१ साज ७४२ कांदेगुणांची आवक झाली असून ९६ हजार वरून ही आवक ७१ हजारावर आली आहे. या लिलावात ५ ते १० वक्कलला १६ ते १७ रुपये प्रतिकिलो भाव तर १ नंबर कांद्याला १३ ते १५ रुपये प्रति किलो ,२ नंबरच्या कांद्याला १० ते १२ रुपये प्रति किलो,तर ३ नंबरच्या कांद्याला ६ ते ९ रुपये प्रति किलो,तर गोल्टी कांद्याला ९ ते १२ रूपये प्रति किलो भाव मिळाला असल्याची माहिती उपसभापती किसनराव सुपेकर व माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version