टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जागृत ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरा झाला. पंचक्रोशीतील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाची यात्रा दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवसापासून सुरू होऊन २१ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांनी रंगली. यात्रेच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे भव्य निकाली कुस्त्यांचा हगामा, ज्यात नामवंत पैलवानांनी आपल्या कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

श्री बनाईदेवी सार्वजनिक यात्रा उत्सव समितीने आयोजित केलेल्या या कुस्ती स्पर्धेत नामवंत पैलवानांनी भाग घेतला. मुख्य कुस्त्यांमध्ये पैलवान महेश फुलमाळी विरुद्ध पैलवान आकाश चव्हाण यांची ३१ हजार रुपयांची, पैलवान अंकित धुळगंड विरुद्ध पैलवान ऋत्विक बिन्नर यांची २५ हजार रुपयांची, पैलवान रोहन परदेशी विरुद्ध पैलवान गोवर्धन शिंदे यांची २१ हजार रुपयांची आणि पैलवान अवि साळवे विरुद्ध पैलवान रामा सुरडकर यांची २१ हजार रुपयांची कुस्ती झाली. याशिवाय पैलवान सार्थक वाळुंज विरुद्ध पैलवान कुमार देशमाने (१५ हजार रुपये), पैलवान अतुल नाईकल विरुद्ध पैलवान गणेश फडके (११ हजार रुपये), पैलवान दिनकर पवार विरुद्ध पैलवान भाऊसाहेब वरे (११ हजार रुपये), पैलवान सौरभ मराठी विरुद्ध पैलवान पवन डोनर (१० हजार रुपये) अशा अनेक आकर्षक जोड्या रिंगणात उतरल्या. या स्पर्धा प्रेक्षकांनी प्रचंड उत्साहाने पाहिल्या.

विजेत्या पैलवानांना यात्रा कमिटीचे अध्यक्ष पै. संपत शेठ तराळ आणि उपसरपंच टाकळी ढोकेश्वर रामभाऊ तराळ यांच्यावतीने आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. तसेच मराठा महासंघ पारनेर तालुका अध्यक्ष विक्रम शेठ झावरे आणि बबलू शेठ जयसिंग झावरे पाटील यांच्यातर्फे मानाची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली. या बक्षिस वितरणाने पैलवानांमध्ये जोम निर्माण झाला आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्यांचा सत्कार केला.

बनाई देवी सार्वजनिक यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष संपतराव तराळ आणि उपाध्यक्ष संजय खिलारी (मेजर) यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा संपूर्ण उत्सव शांततेत आणि भव्यतेने पार पडला. चार दिवस चाललेल्या यात्रेत कुठलेही गालबोट लागले नाही. कुस्त्यांच्या हगाम्याच्या दिवशी उपसरपंच किरण तराळ, अशोक कटारिया, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाबासाहेब खिलारी, पोपटशेठ कटारिया, डॉ. दीपक आहेर, जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, महसूल अधिकारी शरद झावरे, सुभाष वराळ पाटील, बबलू शेठ झावरे, माजी उपसभापती विलास झावरे, सामाजिक कार्यकर्ते श्रावण गायकवाड, प्रकाश चिकणे, रसिक शेठ कटारिया, ग्रामपंचायत सदस्य दत्ता निवडूंगे, पत्रकार शरद झावरे, अविनाश पायमोडे, साहिल शिंदे, प्रकाश इघे, यांच्यासह जिल्हाभरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्रा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी मेजर, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळशिरम पायमोडे, विक्रमशेठ झावरे, अंकुशशेठ पायमोडे, मळीभाऊ रांधवन, विकास आल्हाट आणि संपूर्ण यात्रा कमिटी टाकळी ढोकेश्वर यांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रेच्या सुरक्षेसाठी पारनेर पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

टाकळी ढोकेश्वरची बनाई देवी यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून, ती सांस्कृतिक एकतेचे आणि ग्रामीण परंपरांचे जिवंत उदाहरण आहे. कुस्ती हगाम्यासह विविध कार्यक्रमांनी यात्रा प्रेक्षकांच्या मनात अमिट ठसा उमटवून गेली. गावकऱ्यांसह परिसरातील भाविकांनी या उत्सवात सहभाग घेतला आणि भविष्यातही अशा भव्य उत्सवांची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version