पारनेर / भगवान गायकवाड,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पारनेर तालुक्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिला तालुकाध्यक्षपदी आरती सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, युवक आघाडीच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या आहेत. ही माहिती तालुकाध्यक्ष किरण सोनवणे आणि उपाध्यक्ष अजय साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महिला तालुकाध्यक्ष आरती सोनवणे (बिनविरोध निवड),युवक उप तालुकाध्यक्ष दीपक साळवे, कार्याध्यक्ष (युवक)राजेश सांगवे , पानोली शहराध्यक्ष विशाल साळवे
या निवडीमुळे पारनेर तालुक्यात पक्षाच्या कार्याला नवीन गती मिळणार असून, विशेषतः महिला आणि युवकांचे संघटन वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे किरण सोनवणे यांनी सांगितले.या निवडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सुनीता चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या आहेत. या निवडीला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशी दारोळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष मकासारे आणि युवक जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे यांनी विशेष पाठबळ दिले आहे.निवडीच्या प्रसंगी नगर शहराध्यक्ष हरीश अल्हाट, युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आगामी काळात महिला आणि युवकांच्या माध्यमातून तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करू,” असा विश्वास आरती सोनवणे यांनी व्यक्त केला.
