पारनेर / भगवान गायकवाड,
भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य, बोधीसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पारनेर तालुक्यातील (गौतमनगर, )चौंभूत येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. येथील नीलक्रांती तरुण मित्र मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व बांधवांनी सामूहिकरित्या बौद्ध धम्माच्या स्वरूपात त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केले. तसेच, विविध धम्म गाथांचे पठण करून बाबासाहेबांच्या अलौकिक कार्याचे व त्यांनी समाजाला दिलेल्या महान योगदानाचे स्मरण करण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारण, महिलांचे हक्क, शिक्षण आणि लोकशाहीसाठी दिलेला लढा यावर प्रकाश टाकला. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,’ या बाबासाहेबांच्या संदेशाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि त्यांच्या विचारांवर आधारित समाज निर्मितीचा संकल्प सर्वांनी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नीलक्रांती तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभिवादन कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सचिन भालेराव, गणेश भालेराव, राजू भालेराव, संतोष भालेराव, उत्तम भालेराव, राघू गुंजाळ, प्रणल भालेराव (ग्रामपंचायत सदस्य), संदीप म्हस्के, बाळू गुंजाळ, दीपक भालेराव, डॉ. संकेत भालेराव, सुशील भालेराव, दगडू भालेराव, सनी भालेराव, अजित भालेराव, अनिकेत भालेराव, बंडू भालेराव, भागाशेठ चाटे, राहुल भालेराव यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महामानवाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना वंदन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या महान योगदानाचा गौरव करत हा कार्यक्रम शांततेत आणि शिस्तीत पार पडला.
